
कौमारभृत्य म्हणजेच बालरोग या आयुर्वेदातील शाखेला आचार्यांनी अष्टांगामध्ये अग्रस्थान प्रदान केले आहे. बालपण हा आयुष्यातील विकासाचा एक महत्त्वाचा काळ आहे, कारण शारीरिक, बौद्धिक (संज्ञानात्मक) आणि सामाजिक-भावनिक क्षेत्रांमध्ये जलद वाढ हे मुलांच्या नंतरच्या वाढीचे बिल्डिंग ब्लॉक्स बनवते.
बालकांमध्ये जास्त प्रमाणात दिसणारे व्याधी जसे की वर्तनविषयक विकार (Behavioural disorders), त्वचेचे विकार, जन्मजात शारीरिक दोष (Muscular dystrophy, Cerebral palsy), बालकुपोषण/फक्क, वारंवार सर्दी व खोकला, बालपणातील दमा, गोवर, कांजण्या, ज्वर आणि अतिसार यांसारख्या रोगांची लक्षणे दिसतात.
त्वचा विकार
यामध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन, स्केबीज (खाज), कांजण्या, त्वचेवर लहान पुटकुळ्या येणे व त्या पुटकुळ्यांतून पाणी येणे, तसेच तोंड, हात व पाय या ठिकाणी लालसर पुरळ येणे (Hand, Foot & Mouth Disease) यांचा समावेश होतो. यासोबत इतर लक्षणे जसे दाह, खाज, त्वचेवर दाद उठणे तसेच व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर पांढरे डाग दिसतात.
बालकुपोषण / फक्क
Muscular dystrophy, Kwashiorkor आणि रिकेट्स (फक्क) हे Nutritional deficiency (पोषणाच्या कमतरतेमुळे होणारे विकार) यामध्ये समाविष्ट होतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D यांच्या कमतरतेमुळे हाडांचे योग्य पोषण होत नाही. त्यामुळे अशा बालकांना हालचाल करण्यास त्रास होतो आणि त्यांच्या शरीरयष्टीत वयानुसार अपेक्षित बदल दिसून येत नाहीत.
सर्दी, खोकला
0-16 yrs या वयोमानातील बालक ही कफदोष अधिक असणारी असतात. त्यामुळे बदलत्या ऋतूंच्या संधिकाळात किंवा प्रतिकारशक्ती कमी झाल्यास वारंवार सर्दी, खोकला, ज्वर येणे ही लक्षणे दिसतात.
आताच्या काळात लहान मुले अतिप्रमाणात junk food सेवन करताना दिसतात, तसेच मोबाईल, टीव्हीचा अतिवापर यामुळे नेत्ररोगांनी चष्मे बहुदा बनण्याची वेळ त्यांच्यावर येते आहे.
बाहेर तयार होणारे junk food खाल्याने त्यांची ग्रहणी (अन्न पचन करणारा अवयव) यावर परिणाम होतो व काही वेळा अतिसार किंवा कोष्ठबद्धता ही लक्षणे दिसतात व त्यामुळे इतर गुदमार्गासंबंधित व्याधी लहान मुलांमध्ये होताना दिसतात.
कृमी, Autism (मनोविकार), Delayed milestone, ADHD (Attention deficit hyperactivity disorder) या सारखे देखील अनेक वेगवेगळे व्याधी पाहण्यास मिळतात.
आयुर्वेदामध्ये अनेक आचार्यांनी त्यांच्या मतानुसार बालकांमध्ये काय योग्य व काय अयोग्य यांचे वर्णन केलेले आढळते, ते आपण समजून घेऊया.
पथ्य आहार
आचार्यांनी लघु (हलके) व सहज पचणारे जसे तांदूळ, गहू, ज्वारी, मूग, राजगिरा, मसूर, सोयाबीन, बाजरी, मखाना तसेच मधुर रसात्मक आहारद्रव्यांचा वापर करण्यास सांगितला आहे. तसेच सीझनल फळे जसे अंजीर, पेरू, सफरचंद, खजूर, आंबा, डाळिंब, खरबूज यांचे सेवन करावे. दुग्ध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये तूप, ताक, दही, लोणी यांचा आहारात समावेश करण्यास सांगितले आहे. प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आहारद्रव्यांचा अवलंब करावा.
पथ्य विहार
सूक्ष्म व्यायाम करणे, मोकळ्या जागेत (outdoor games) खेळणे, पुस्तक वाचन, कोवळ्या उन्हात फिरायला जाणे, २ वेळा दंतधावन करणे, औषधी तेलाने अभ्यंग करणे, शारीरिक स्वच्छता राखणे यांचे वर्णन केले आहे.
अपथ्य आहार- विहार
खूप स्निग्ध, तिखट, लवण रसात्मक द्रव्य सेवन, अतिप्रमाणात junk food, चीज, पनीर यांना आहारातून वर्ज्य करावे असे सांगितले आहे. तसेच अतिप्रमाणात टीव्ही, मोबाईल यांचा वापर करणे, खेळायला न जाणे, अवेळी जेवण करणे या गोष्टी करू नये असे म्हटले आहे.
आयुर्वेदानुसार बालकांच्या रोगांमध्ये योग्य निदान व त्यानुसार चिकित्सा करणे गरजेचे आहे. रोगानुसार त्याची चिकित्सा, आहार, बालकाची प्रकृती यानुसार औषध, पंचकर्म या सगळ्यांचा विचार केला जातो.
Cerebral palsy किंवा muscular dystrophy या व्याधींमध्ये पिंडस्वेद या पंचकर्माचा खूप छान उपयोग होताना दिसतो.
Autism, ADHD या सारख्या व्याधींमध्ये मेध्य औषध, मनावर काम करणारी औषधे तसेच विरेचन, पंचकर्मातील स्नेहन-स्वेदन करून बस्ती देणे या सारख्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब करता येतो.
सुवर्णप्राशन हे इम्युनिटी बूस्टर, कॉन्सेंट्रेशन वाढवणे, शारीरिक बल वाढवणे यासाठी 0-16 yrs या वयोगटातील बालकांमध्ये वापरण्यास सांगितले आहे. वयोमानानुसार किती थेंब द्यावे हे सांगितले जाते. दररोज सकाळी किंवा पुष्य नक्षत्राच्या दिवशी याचे प्राशन केले जाते.
इतर आजारांसारखी बालकुपोषण ही एक मोठी समस्या आहे. आपल्या चिकित्सालयात मोदामृत नावाचे औषध निर्माण करण्यात आले आहे. हे बिस्किट व दुधातून घेण्यासाठी ग्रॅन्युल्स या स्वरूपात आहे. यामध्ये बालकुपोषणातून मुक्त करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला आहे.
तसे म्हटले तर कृमी हे सर्व व्यक्तींमध्ये असतात, पण बालपणात अतिप्रमाणात त्यांची लक्षणे व्यक्त होताना दिसतात. यासाठी आपल्या पाल्याला कृमींची चिकित्सा वैद्याकडून करून घेणे आवश्यक आहे. असे केल्यास वारंवार आजारी पडण्याची तक्रार दूर होते.
सद्याच्या काळात मोबाईलचा अतिवापर, झोपेच्या वेळा बदलल्या आहेत व त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. लहानपणापासूनच लवकर झोपणे व लवकर उठणे या सवयी लावल्यास मोठे झाल्यावर इतर दुष्परिणाम टाळता येतात.
तर बालकांमध्ये होणाऱ्या रोगांना घाबरून न जाता योग्य निदान, औषधोपचार, पंचकर्म, योग मार्गदर्शन घ्या आणि त्यांना कायमचा निरोप आयुर्वेदाच्या औषधोपचारांनी द्या. बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊया, चला भारत सशक्त करूया.
अधिक माहिती साठी संपर्क –
विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर
विश्वपंढरी समोर, श्री सद्गुरू विश्वनाथ महाराज रुकडकर मार्ग, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६०१२
फोन – ०२३१-२६२४०४४, ७३५०६२३६३६

Comments are closed