
बदलत्या हवामानमुळे आरोग्याचा बदलांसाठी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती जबाबदार असते. हवामान बदलते आणि आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक प्रभाव पडतो व ती कमकुवत होते, त्यामुळे संक्रमण वेगाने दिसून येते.
६ ऋतुंपैकी, शिशीर ऋतु सध्या आपण अनुभवतो व त्या काळात वातावरणात गारवा व कोरडे वारे सुटलेले असतात.
ऋतुसंधी या शब्दाची फोड करायची तर ऋतु म्हणजे सीझन आणि संधी म्हणजे २ ऋतुंना जोडणारा मधला काळ. या काळात आधीच्या ऋतु चे ७ दिवस व नंतरच्या ऋतु चे पहिले ७ दिवस यांचा समावेश होतो. या काळात आपले शरीर हे संसर्गजन्य व्याधींच्या विळख्यात अडकण्याचा संभव असतो.
हिवाळा व पावसाळ्यात शरीराला संसर्गजन्य व्याधींची लागण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हिवाळयात सर्वात जास्त दिसणारे व्याधी जसे सर्दी, पडसे, उदरशूल (पोटदुखी), त्वचा कोरडी होणे, फ्लू, श्वसनाच्या तक्रारी, वायरल इन्फेक्शन या रोगांची लक्षणे दिसतात.
सर्दी,पडसे हा वरील श्वसनमार्गातील संसर्ग (यूआरटीआय) विविध वायरसेस मुळे होते. हे मु्ख्यतः लहानमुले, वृद्ध व ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांन मध्ये आढळते. याची लक्षणे घसा खवखवणे, खोकला (कोरडा/ कफसहित), नाकातून पाणी येणे, शिंका, डोळयातून पाणी येणे, शिरःशूल, क्वचित ज्वरप्रचिती यांचा समावेश होतो.
पोटाचे आजार हे हिवाळयात जास्त प्रमाणात बघण्यास मिळतात. हे वायरल इन्फेक्शन किंवा फीकोओरल कंटामिनेशन, स्ट्रीटफूड एण्ड ड्रिंक्स यांचा सेवनामुळे होतात. यामध्ये पोटाचा म्यूकोसल लाईनिंग ला सूज येते व या मध्ये उलटी होणे, मळमळ, अतिसार, पोटात कळा येणे ही लक्षणे असतात. क्वचित काही वेळा शीतप्रचीती, शिरःशूल ,थकवा, अंगदुखी ही लक्षणे देखील आढळतात.
त्वचा अतिप्रमाणात कोरडी पडणे हे वातावरणातील दमट हवा कमी झाल्यामुळे व गारवा आणि कोरडी हवा यामुळे त्वचेतीलपाण्याचा अंश यांचे शोषण होऊन त्वचा कोरडी पडते व खेचल्यासारखी निस्तेज दिसू लागते. या काळात अंगाला खाज येणे, शीतपित्त, rashes ही लक्षणे दिसतात.
फ्लू हा आजार सर्दी प्रमाणेच समजला जातो पण हे दोन्ही वेग-वेगळे आहेत. फ्लू कॉमनली आढळणारे वायरल इन्फेक्शन असून त्यात फुफ्फुस, घसा, नाक या ३ अवयवांचा समावेश होतो. या मध्ये ज्वर, शीतप्रचिती, घसा खवखवणे, मळमळ, लिम्फ नोड्स ला शोथ, शिर:शूल ही लक्षणे दिसतात.
सर्व हिवाळ्यात व त्यानंतर होणाऱ्या व्याधींमध्ये काय काळजी घ्यावी हा विचार प्रत्येकाचा मनात असतो त्यासंबंधी माहिती घेऊया.
- पोटातील संसर्ग, सर्दी, फ्लू यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या वैयक्तिक स्वच्छतेचा सराव करणे हा महत्वाचा मार्ग आहे.
- संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे ( औषधी तेलाने ) या मुळे त्वचेचे रोग टाळता येतात व त्वचा मूलायम व तजेलदार दिसते.
- आपला चयापचय उच्च ठेवण्यासाठी मध्यम व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. आपण सूर्यनमस्कार, योगासने करू शकतो जे शरीरातील उष्णता वाढवण्यास आणि हृदयाची कार्ये सुधारण्यास मदत करतात जेणेकरून शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्ताभिसरण सुधारते.
- जलनैति सारख्या योगिक क्रियांचा सराव केल्याने वरच्या श्वसनमार्गातून (युआरटीआय) अतिरिक्त श्लेष्मा काढून टाकण्यास मदत होईल आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय योग्य वायुप्रवाह होण्यास मदत होईल. अशाप्रकारे ते दम्याच्या स्थितीत देखील मदत करते आणि रक्तसंचय, ऍलर्जी आणि सर्दी कमी करते. योग्य योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव केला पाहिजे.
- सूप हे आपल्या हिवाळ्यातील मेनूमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम आहार आहे. विविध भाज्या व मिक्स्ड हर्ब्स ,आले, लसूण, मिरपूड, जिरे इ. हिवाळ्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून हे आणखी वेगळ्या प्रकाराने बनवता येते.
- आहारामध्ये विटामिन सी समृद्ध अन्न जसे आवळा, स्ट्रॉबेरी, ब्रोकोली, उकडलेले कडधान्य( मोड न आणलेले), मिरी, लिंबू, संत्री, तीळाचे लाडू यांसारख्या आहार द्रव्यांचा समावेश करावा.
- आयुर्वेदिक उपचारांतर्गत विविधऔषधी कल्प,चूर्ण,काढा,गोळ्या या स्वरूपात यांचे वर्णन आढळते व ते वैद्यांचा मार्गदर्शनाने सेवन केले पाहिजे. तुळस, हळद यांचा रोजच्या आहारामध्ये उपयोग केल्यास ते antiseptic व antiviral गुणधर्मामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
- आयुर्वेदामध्ये bioactive health supplement म्हणून च्यवनप्राश कडे पाहिले जाते.त्याचे योग्य मात्रेत सेवन केल्यास ते रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- पुरेशा प्रमाणात कोमट पाणी घेतल्याने त्वचांची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होईल.
तर ह्या बदलत्या ऋतुमुळे होणाऱ्या रोगांना घाबरून न जाता योग्य निदान औषधोपचार, योग मार्गदर्शन घ्या आणि त्यांना कायमचा निरोप आयुर्वेदाच्या औषधोपचारांनी द्या.

Comments are closed