post banner2

संधिवात म्हटला की अनेक जणांना खुप काळजी वाटते . काही तरी भयानक आजार झाला आहे आणि आता ह्यातून काही सुटका नाही असे अनेक गैरसमज अनेकांच्या मनात येतात. सांधेदुखी, तीव्र वेदना, वेदानांमुळे हालचालींवर आलेली मर्यादा ह्या सर्वांना रुग्ण सामोरे जात असतो आणि त्यात भर म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी पसरवले संधीवाताबद्दल अनेक गैरसमज. आता काय बाबा आयुष्यभर दुखणं सुरू तुमचं, नेहमीच औषध घ्यावी लागणार, वैगरे वैगरे. परंतु हा आजार आयुर्वेदाच्या उपचाराने पूर्णतः बरा होऊन तो पुन्हा उद्भवू नये ह्या करिता सुधा आयुर्वेद खूप सशक्त आहे हे खूप लोकांना माहिती नसते. तर आज आपण त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात.

संधिवात म्हणजे नेमकी काय?

अनेक कारणांमुळे दूषित झालेला वात हा सांध्यांच्या ठिकाणी येऊन दुखणे/ सूज/ हालचालींवर मर्यादा निर्माण करते ह्याला संधिवात म्हणतात. उतरत्या वयात होणारा हा आजार सध्या खूप अलीकडे म्हणजे तरुण पिढीमध्ये सुद्धा दिसून येतो तो का हे आपण बघुयात

कशामुळे होते ?

आहारातील करणे- वात वाढविणार आहार घेणे म्हणजे जास्त रुक्ष/ थंड पदार्थ जास्त घेणे , मोड आलेली कडधान्य जास्त खाणे, बेसन चे पदार्थ जास्त घेणे

विहारातील करणे – सतत गार पाण्याने अंघोळ करणे, गार वाऱ्यावर फिरणे, AC मध्ये जास्त वेळ काम करणे, उशिरा झोपणे, रात्री जागरण, दुपारची झोप, व्यायामाचा अभाव आणि अतिशयोक्ती सुद्धा

लक्षणे काय?

हा कोणताही सांध्यांना होवू शकतो. जास्त करून तो मोठ्या सांध्यांना दिसून येतो . “वातपूर्णदृतिवत स्पर्श” म्हणजे संध्यांमध्ये वाताची एक गोणी ठेवली आहे असे वाटणे हे त्याचे प्रमुख लक्षण. सर्व सांधे दुखणे, हालचालींवर मर्यादा येणे, सूज इ.

निदान/. ओळखायचा कसा

सांध्यांचे अनेक आजार आयुर्वेदात सांगितले आहे. कोणताही सांधा दुखतो म्हणजे तो लगेचच संधिवात झाला हा गैरसमज पहिल्यांदा दूर करूयात. एखादा सांधा का दुखतो ह्यामागे अनेक कारणे असतात. कुठे मुक्का मार लागला होता का, ताप येऊन मग दुखणे सुरू झाले आहे का इ अनेक गोष्टींचा विचार करून नक्की सांधेदुखी ही संधीवतामुळे आहे की आमवात , वातरक्त अशा इतर व्याधिंमुळे आहे हे आपण वैद्यांकडे जाऊन तपासून घेतले पाहिजे. श्री विश्र्ववती येथे रुग्णाची पूर्णतः history घेउन शारीरिक परीक्षण तसेच विशेषतः नाडी परिक्षण करून अचूक निदान केले जाते. अचूक निदान हे चिकित्सेच्या दृष्टीने उचलले सर्वात महत्त्वाचे पाऊल.

चिकित्सा काय?

विविध प्रकारच्या औषधी द्रव्य / काढे / गुग्गुळ कल्प ह्यांचा वापर ह्यात होतो. अवस्थेप्रमाणे पंचकर्मातील बस्ती / चूर्ण पोट्टली स्वेद / पत्र पोट्टली स्वेद असे उपचार उपयोगी असतात.

पथ्य अपथ्य

वातुळ पदार्थांचे सेवन बंद करणे . रात्री जागरण दिवस झोपणे बंद करणे. तसेच गार वाऱ्यात फिरणे AC चे वारे इ बंद करणे

परत होऊ नये ह्या करिता काय करता येते

आयुर्वेदामध्ये “अपुनर्भव चिकित्सा” हा concept खूप सुंदर आहे. व्याधी होऊन गेला की तो परत उद्भवू नये याकरिता घेण्याची काळजी ह्यात सांगितली जाते. अजून एक गैरसमज जो संधीवताबद्दल लोकांच्या मनात असतो तो म्हणजे एकदा का संधिवात झाला की हवामान बदलल्यावर त्रास उद्भवणार. ते होऊ नये ह्या करिता आपण वैद्यांच्या मार्गदर्शना खाली ही अपूनर्भव चिकित्सा करावी.

Categories:

Tags:

Comments are closed