maadhav rasayan plus

श्री विश्ववती आयुर्वेद संशोधन केंद्राने इम्युनिटी साठी ‘रस माधव वटी’ व कोविड व अन्य व्हायरल तापांसाठी ‘माधव रसायन’ वटी यांचे संशोध केले होते व त्याचा लाखो रुग्णांना लाभ झाला असे आपण जाणता. संशोध केंद्राने पोस्ट कोविड समस्यांचे समग्र आकलन करून त्यावर विशेष संशोधित “माधव रसायन प्लस” या औषधाची निर्मिती केली आहे.

 

कोविड ताप हा साधा ताप नसून त्यातील व्हायरस व त्याचे शरीरातील फुफ्फुसाच्या पेशी, रक्त गुठळी करणारी यंत्रणा, मांस पेशी, इंद्रिये व मेंदू व काही रुग्णांत हृदय व किडनी वर होणारे परिणाम असा एकत्रित विचार त्यात करावा लागतो. पोस्ट कोविड लक्षणांत विविक्षित थकवा, दम/धाप लागणे, 5-6 वाक्ये एकत्रित बोलु न शकणे, मांस पेशीतील दुखावा व दौर्बल्य ही मुख्य लक्षणे आहेत. काही रुग्णांत चव व वास संज्ञा परत न येणे, स्मृतिभ्रंश, झोप कमी होणे, मानसिक थकवा, नैराश्य अशी मेंदू संस्थेशी संबंधित लक्षणे व थकव्या सोबत च छातीत दुखणे, धडधड व खोकला अशी हृदय-फुफ्फुसांशी निगडित लक्षणे देखील मिळत आहेत. रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्या शरीरात अक्षरशः कोणत्याही वाहिनीत अडकू शकणे व तत्संबंधी अवयवां ना त्रास होऊ शकणे ही टांगती तलवार ही आहेच. तर अलीकडे मिळालेल्या डेटा नुसार यकृताचे काम मंदावणे व किडनी च्या काही समस्या सुरू होणे अशी ही लक्षणे आहेत.

 

एरंडमूळ, सुंठ, शत पुटी अभ्रक भस्म सारखे घटक हृदयाची तर जेष्ठमध अडुळसा, तुळशी हे घटक फुफ्फुसांची ताकत वाढवण्यास उपयुक्त आहेत. रस-रक्त धातू चा कस सुधारवणे व प्रवाह नियमित ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी मंजिष्ठा, गुळवेल लोह भस्म यासारख्या गोष्टी यात वापरल्या आहेत. मांस पेशींची दुर्बलता व वेदना कमी करण्यासाठी यात वापरलेले मंजिष्ठा, अश्वगंधा, एरंडमूळ अमृतासमान उपयोगी आहेत! शतावरी गुळवेल, जेष्ठमध सारखी मेंदू व मज्जा संस्थेवरील रसायन औषधे मेंदू इंद्रिय संबंधी लक्षणे, स्मृतीभ्रंश व मानसिक थकवा दूर करण्यास उपयुक्त आहेत. यातील बहुतांश घटक रसायन गुणधर्माचे असलेने शरीराच्या पेशींचे झालेले damage भरून काढणेस उपयुक्त आहेत. अश्वगंधा, मोती पिष्टी व जटामांसी सारखे घटक मानसिक थकवा व अनुत्साह घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर दालचिनी, नागवेली चे पान सारखे घटक सूक्ष्म स्तरावरील पचन (मेटाबॉलिझम) सुधारवणारे आहेत व त्या द्वारे यकृत व किडनी सारख्या अवयवांवर कोविडचे परिणाम टिकणार नाहीत याची काळजी घेतात.

 

सारांशत: कोविड/ व्हायरल तापानंतर च्या सर्व तक्रारीसाठी हे औषध उपयुक्त आहे.

Categories:

Tags:

Comments are closed